e-KYC फॉर्ममध्ये दिसणारे नवीन पर्याय
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC प्रक्रिया 2025 मध्ये अपडेट करण्यात आली आहे. अधिकृत e-KYC फॉर्ममध्ये काही नवीन प्रश्न, अनिवार्य declaration आणि अंतिम तारीख स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. या बदलांचा उद्देश पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळावा, चुकीची माहिती रोखली जावी आणि DBT प्रणाली अधिक पारदर्शक राहावी हा आहे.
सुरूवातीला official website https://ladakibahin.maharashtra.gov.in/ जा त्यानंतर असा window दिसेल.
त्यानंतर (येथे क्लिक करा) या ऑप्शनवर क्लिक करा.
येथे आपला आधार नंबर समाविष्ट करा.
त्यानंतर otp प्राप्त करून तो otp सबमीट करा. या ठिकाणी खालील दोनच पर्याय दिलेले दिसतात:
- विवाहित
- अविवाहित
तुम्हाला विवाहित असाल तर विवाहित या बटनावर क्लिक करावयाचे आहे. किंवा अविवाहित असाल तर अविवाहित या बटनावर क्लिक करावयाचे आहे.
जर “विवाहित” पर्याय निवडला, तर पुढील टप्प्यावर खालील प्रश्न दिसतो:
- पती हयात आहेत
- पतीचे निधन झाले
- घटस्फोटित
हा प्रश्न विशेषतः विधवा महिलांची स्थिती स्पष्ट करण्यासाठी विचारला जातो. त्यामुळे वैवाहिक स्थिती आणि पतीची माहिती स्वतंत्रपणे नोंदवली जाते.
2025 च्या e-KYC फॉर्ममध्ये खालील दोन महत्त्वाचे प्रश्न अनिवार्य करण्यात आले आहेत:
A) लाभार्थी स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून / सरकारी विभाग / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था / केंद्र किंवा राज्य शासनाच्या संस्थेत कार्यरत आहेत का?
B) कुटुंबातील सदस्य वरीलपैकी कोणत्याही सेवेतून निवृत्त झाले आहेत का ?
प्रत्येक प्रश्नासाठी:
· आहे
· नाही
हे पर्याय दिलेले असून चुकीची माहिती दिल्यास लाभावर परिणाम होऊ शकतो.
Declaration –
खोटी माहिती आढळल्यास शासनाला लाभ बंद करण्याचा व पुढील कारवाईचा अधिकार आहे
हा भाग e-KYC प्रक्रियेत कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
e-KYC अंतिम तारीख :- 31 डिसेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रे (गरज असल्यास) अंगणवाडी सेविका / अधिकृत यंत्रणेकडे सादर न केल्यास e-KYC प्रक्रिया अपूर्ण मानली जाऊ शकते.
यामुळे: पुढील हप्ते थांबू शकतात, DBT लाभात अडथळा येऊ शकतो
e-KYC करताना आवश्यक काळजी:- 1.आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक
2.बँक खाते DBT साठी सक्रिय असावे
3.वैवाहिक स्थिती व सरकारी नोकरीबाबत अचूक माहितीच भरावी
4.कोणत्याही अनधिकृत लिंकवर OTP किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये
e-KYC करताना:-
· फॉर्म भरताना अडचण
· माहिती समजत नसेल
· स्टेटस अपडेट होत नसेल
तर जवळच्या सेतू केंद्र
(Setu Kendra) किंवा CSC (Common Service Center) मध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी.
निष्कर्ष
· त्यामुळे सर्व लाभार्थींनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी e-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा लाभ थांबण्याची शक्यता राहू शकते.
Disclaimer
- या लेखामध्ये दिलेली माहिती ही अधिकृत सरकारी e-KYC फॉर्मवर दिसणाऱ्या तपशीलांवर आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीवर आधारित आहे. लेखाचा उद्देश केवळ सामान्य माहिती व जनजागृती करणे हा आहे.
- ही वेबसाइट कोणत्याही सरकारी विभागाशी, मंत्रालयाशी, योजनांच्या अधिकृत पोर्टलशी किंवा प्रशासनाशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संलग्न नाही.
- e-KYC प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे किंवा अंतिम निर्णय हे पूर्णपणे संबंधित सरकारी यंत्रणेच्या अधिकारात आहेत.
- फॉर्ममध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात; त्यामुळे वाचकांनी अंतिम आणि अद्ययावत माहितीसाठी अधिकृत पोर्टल किंवा अधिकृत केंद्रांचा संदर्भ घ्यावा.
- या लेखातील माहितीवर आधारित कोणताही निर्णय घेतल्यास त्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील.
- या वेबसाइटवरून कोणतीही वैयक्तिक माहिती, OTP, आधार किंवा बँक तपशील मागितले जात नाहीत.
- e-KYC प्रक्रियेसंदर्भात अडचण, शंका किंवा तांत्रिक समस्या असल्यास जवळच्या सेतू केंद्र (Setu Kendra) किंवा CSC (Common Service Center) येथे प्रत्यक्ष भेट देणे हा सुरक्षित मार्ग आहे.





Comments
Post a Comment