मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC: घरबसल्या मोबाईलवरून करा ई-केवायसी आणि मिळवा दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत
Ladakibahin.maharashtra.gov.in मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम तारीख आहे. योजनेच्या पात्रतेसाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय २१ ते ६५ वर्षे असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. याशिवाय, कुटुंबात चारचाकी वाहन नसणे आवश्यक आहे. आधार लिंक्ड बँक खाताही असणे आवश्यक आहे.ई-केवायसीसाठी अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्या. आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून ओटीपी प्राप्त करा, नंतर तो ओटीपी वेबसाइटवर तयार केल्यावर ई-केवायसी पूर्ण होतो. वडील किंवा पतीचा आधार नसेल तर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करावी लागते. जर तुम्ही पिवळा/केशरी रेशन कार्डधारी असाल तर उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही. ई-केवायसी न केल्यास तुमचा लाभ थांबवला जाईल, त्यामुळे वेळेत प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास जिल्हा महि...