Skip to main content

Posts

Showing posts with the label माझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजना e-KYC नवीन अपडेट 2025 : अधिकृत फॉर्मनुसार संपूर्ण माहिती

e-KYC  फॉर्ममध्ये दिसणारे नवीन पर्याय  महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC प्रक्रिया 2025 मध्ये अपडेट करण्यात आली आहे. अधिकृत e-KYC फॉर्ममध्ये काही नवीन प्रश्न , अनिवार्य declaration आणि अंतिम तारीख स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. या बदलांचा उद्देश पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळावा , चुकीची माहिती रोखली जावी आणि DBT प्रणाली अधिक पारदर्शक राहावी हा आहे. सुरूवातीला official website https://ladakibahin.maharashtra.gov.in/ जा त्यानंतर असा window दिसेल. त्यानंतर (येथे क्लिक करा) या ऑप्शनवर क्लिक करा.  येथे आपला आधार नंबर समाविष्ट करा. त्यानंतर otp प्राप्त करून तो otp सबमीट करा. या ठिकाणी खालील दोनच पर्याय दिलेले दिसतात: विवाहित  अविवाहित तुम्हाला विवाहित असाल तर विवाहित या बटनावर क्लिक करावयाचे आहे. किंवा अविवाहित असाल तर अविवाहित या बटनावर क्लिक करावयाचे आहे. जर “ विवाहित ” पर्याय निवडला , तर पुढील टप्प्यावर खालील प्रश्न दिसतो: पती हयात आहेत पतीचे निधन झाले घटस्फोटित  ...